टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सत्कार

टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा


विधानसभा अध्यक्ष पटोले यांच्या हस्ते सत्कारमुंबई प्रतिनिधी : टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सत्कार विधानभवन येथे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यकारिणीचे अध्यक्ष सर्वश्री विनोद जगदाळे, उपाध्यक्ष कल्पेश हडकर, सचिव राजेश माळकर, सहसचिव अक्षय कुडकेलवार, कोषाध्यक्ष राजीव रंजन, सदस्य सर्वश्री समीर शेळके, राजू रेवनकर, सुरेश साहिल, अजित शिवतरकर, संतोष पानवलकर, संदीप पाटील, राजू सोनावणे, सर्वेश तिवारी, मनश्री पाठक, उर्वशी खोना यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. पटोले यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीसोबत अनौपचारिक संवाद साधला व त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. ही संघटना भविष्यामध्ये अधिक मजबूत व्हावी अशी आशा व्यक्त करुन पुढील वाटचालीसह दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.


    कार्यकारिणीचे अध्यक्ष जगदाळे यांनी टीव्ही पत्रकार आणि कॅमेरामन यांना अत्यावश्यक सेवेमधील कर्मचाऱ्यांसोबत लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी. तसेच पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्यास खासगी व सरकारी रुग्णालयात आरक्षित बेडची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी केली.


 दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..