सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांना राज्यपालांचे अभिवादन

सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांना राज्यपालांचे अभिवादन



मुंबई प्रतिनिधी : दिवंगत उपपंतप्रधान लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राजभवन येथे पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची आज 36 वी पुण्यतिथी. त्यानिमित्ताने राज्यपालांनी इंदिरा गांधी यांच्याही प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. सरदार पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. यानिमित्त राज्यपालांनी राजभवनातील कर्मचारी, अधिकारी व उपस्थित पोलीस जवान यांचेसह राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेतली.


      देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षा राखण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याची तसेच देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आपले योगदान देण्याची यावेळी शपथ देण्यात आली. राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, उपसचिव श्वेता सिंघल, खासगी सचिव उल्हास मुणगेकर तसेच अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.


 दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..