दिवाळी गोड झाली

दिवाळी गोड झाली



ठाणे प्रतिनिधी मिलिंद महाडिक : कोरोना सारख्या महामारीच्या काळात अनेक परिस्थितीशी लोकांना सामना करावा लागला, त्यातच दसरा दिवाळी सारखे सण असून सुद्धा  या आजाराच्या भीतीने कुठे तरी लोकांचा उत्साह लोप पावला होता, या परिस्थितीत  आश्रय बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेने(रजि.), ठाणे पुढाकार घेऊन येऊर येथील जांभूळपाडा आदिवासी वस्तीवर गरजू लोकांना दिवाळी चे फराळ, किराणा सामान देऊन तेथील लोकांची दिवाळी गोड केली. या कार्यक्रमावेळी संस्था अध्यक्ष  रविंद्र बोराडे, सेक्रेटरी आशिष परदेशी, खजिनदार नितेश घोसाळकर, सदस्य गणेश कुठे, सदस्य मिलिंद महाडीक, आश्रयदाते पंकज परदेशी, श्रीकांत परदेशी, रितेश चव्हाण, योगेश गवस, अरूण उपार, संतोष पाटील, आशोक हेमाडे, सोमा पटेल, समशेर बिष्ट, गणेश पांचाळ, संतोष मतकर, बालिका समृद्धी गणेश पांचाळ, बालिका शर्वरी संतोष मतकर, नरेश महाजन, रामदास धवन आदी सहकारी यांनी सहभाग घेऊन लोकांच्या चेह-यावर हसू आणण्यास पुढाकार घेतला.


 दिगंबर वाघ  


 कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..