लोक जैवविविधता सुधारणेच्या कार्यास गती द्यावी

लोक जैवविविधता नोंदवहीची गुणवत्ता सुधारणेच्या कार्यास गती द्यावी


- वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणेमुंबई प्रतिनिधी : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जैवविविधता व्यवस्थापन समित्यांची स्थापना व लोक जैवविविधता नोंदवही तयार करण्यात आली आहे. या नोंदवहीची गुणवत्ता तपासण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी असे वने राज्यमंत्री  दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.राज्यात तयार करण्यात आलेल्या लोक जैवविविधता नोंदवही संदर्भात बैठकीचे आयोजन मंत्रालयात करण्यात आले. या बैठकीस वन विभागाचे उपसचिव गजेंद्र नरवणे, सॅट्स संस्थेचे उमेश धोटेकर यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


      राज्यमंत्री  दत्तात्रय भरणे म्हणाले, राज्यात २८६४९ स्थानिक स्वराज्य संस्था असून, यामध्ये ग्रामीण २८२५४ आणि ३९५ नागरी संस्थांचा समावेश आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थेत लोक जैवविविधता नोंदवही करण्याचे काम पूर्ण झाले असून, याची गुणवत्ता तपासणे महत्वाचे आहे. या नोंदवहींची गुणवत्ता तपासण्याच्या कार्यवाहीत सॅट्स संस्थेचा सहभाग करून घ्यावा. तसेच, ज्या गावांमध्ये मेडिसीन विक्री करण्यात येते अशा गावांची नोंद घेऊन हे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करावे. असेही भरणे यांनी यावेळी सांगितले.


 दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..