आद्यक्रांतिवीर बिरसा मुंडा यांना जयंती निमित्त अभिवादन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आद्यक्रांतिवीर बिरसा मुंडा यांना जयंती निमित्त अभिवादन



मुंबई प्रतिनिधी : आदिवासी समाजक्रांतीचे जनक आद्यक्रांतिवीर  बिरसा मुंडा यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अभिवादन केले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी आद्यक्रांतिवीर  बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. मुख्यमंत्री अभिवादनात म्हणतात, भगवान बिरसा मुंडा यांनी इंग्रजांच्या गुलामीत असलेल्या आदिवासी समाजाला मुक्त करण्यासाठी क्रांतिकारक चळवळ सुरु केली. त्यांनी आदिवासी बांधवांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.  त्यांनी आदिवासी समाजामध्ये चैतन्य निर्माण केले. स्वराज्याच्या घोषणेने इंग्रजांपुढेही आव्हान निर्माण केले होते. बिरसा यांच्या ‘उलगुलानʼ या मुक्तीआंदोलनात हजारो  आदिवासी सहभागी होते. आद्यक्रांतिवीर, आदिवासी समाजक्रांतीचे जनक बिरसा मुंडा यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.


 दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..