आबा सावंत सारख्या पोलिसांचा अभिमान

जीवाची बाजी लावून कर्तव्य निभावणाऱ्या आबा सावंत सारख्या पोलिसांचा अभिमान


- गृहमंत्री अनिल देशमुखमुंबई प्रतिनिधी : जीवाची बाजी लावून कर्तव्य निभावणाऱ्या आबा सावंत सारख्या वाहतूक पोलिसांचा  आपल्याला सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काढले. पिंपरी चिंचवड येथे मास्क न घातल्याने एका कार चालकाविरुद्ध कारवाई करत असताना वाहतूक पोलीस आबा सावंत यांना त्या कार चालकाने बॉनेटवर लटकून फरफटत नेले. तरीही मोठ्या हिमतीने त्यांनी आपले कर्तव्य पूर्ण केले.त्यांचा सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन गृहमंत्री महोदयांच्या ज्ञानेश्वरी निवासस्थानी करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, तसेच सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले उपस्थित होते.


     देशमुख यांनी आबा सावंत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. या घटनेबद्दल सविस्तर माहिती विचारली आणि त्यांचे कौतुक केले. आबा सावंत हे लातूर जिल्ह्यातील किल्लारी चे रहिवासी आहेत. आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आबा सावंत यांना 10 हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिल्याचेही गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले


  दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..