बाल दिन कार्यक्रमाचे आयोजन

महिला व बालविकास विभागामार्फत


आज बाल दिन कार्यक्रमाचे आयोजन


ॲड.यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू यांची उपस्थितीमुंबई प्रतिनिधी : बाल दिनानिमित्त महिला व बालविकास विभागाने मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या 12 नोव्हेंबर रोजी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 12 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी ज्युवेनाईल जस्टीस सॉफ्टवेअर बाबत सादरीकरण, या सॉफ्टवेअर मधील ज्युवेनाईल जस्टीस बोर्ड मॉड्युल आणि बालकल्याण समितीसाठी तयार करण्यात आलेल्या आदर्श कार्यपद्धतीचे अनावरण करण्यात येणार आहे. बाल लैंगिक शोषणाच्या अनुषंगाने चांगला स्पर्श, वाईट स्पर्श अर्थात 'गुड टच, बॅड टच' या विषयाबाबत युनिसेफकडून सादरीकरण होणार आहे.


     राज्यात कोविड कालावधीमध्ये विषेश काम केलेल्या आणि सेवा दिलेल्या  महिलांचा गौरव, बाल विवाह प्रतिबंध कामात विशेष कार्य केलेल्या अधिकारी-कर्मचारी आणि संस्थांचा सत्कार, राजमाता जिजाऊ माता-बाल पोषण अभियान अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. कार्यक्रमास महिला व बाल विकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो, महिला व बाल विकास आयुक्त हृषिकेश यशोद आदी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.


 दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..