९ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर रंगमंदिर सुरू

कोरोना साथीच्या काळात नऊ महिनाच्या प्रतिक्षेनंतर आचार्य अत्रे  रगंमंदिर हे एम् एम् आर् रिजन मधील पहिले नाट्यगृह असून  सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाट्य रसिक प्रेक्षकांनी नाटकांचा आस्वाद घ्यावा!

- डॉ विजय सूर्यवंशी आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका


  





कल्याण  प्रतिनिधी कोरोना साथीच्या काळात नऊ महिनाच्या प्रतिक्षेनंतर आचार्य अत्रे  रगंमंदिर हे एम् एम् आर् रिजन मधील पहिले नाट्यगृह असून  सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाट्य रसिक प्रेक्षकांनी नाटकांचा आस्वाद घ्यावा,असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी आज काढले,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रदीर्घ कालावधीनंतर सुरू झालेल्या आचार्य अत्रे रंगमंदिरातील " * तू म्हणशील तसं"*या नाटकाच्या शुभारंभ समयी त्यांनी हे उद्गार काढले. कोरोना पार्श्वभूमीवर लाँकडाऊन नंतर तब्बल नऊ महिन्यानंतर कल्याणातील आचार्य अत्रे रगंमंदिराची दारे नाट्य रसिक प्रेक्षक वर्गासाठी शनिवारी दुपारी साडे चारच्या सुमारास "तु म्हणशील तसं" या नाटकाच्या शुभारंभ प्रयोगाने सुरू झाली.   कल्याण डोंबिवलीतील नाट्यगृहे खुली करण्याच्या आयुक्तांच्या निर्णयानंतर लॉकडाऊन नंतर आज प्रथमतः सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले निर्मित  प्रसाद ओक दिगदर्शित  तु म्हणशील तसं या नाटकाचा शुभारंभ प्रयोग   आचार्य अत्रे रंगमंदिरात संपन्न झाला,   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून नाट्यप्रयोग  सुरू करण्यात आला.  

      कोरोना लॉकडाऊन काळात कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी गेल्या ९ महिन्यापासून महापालिकेची सावित्रीबाई फुले आणि आचार्य अत्रे रंगमंदिर ही नाट्यगृहे बंद होती. त्यापैकी कल्याणातील आचार्य अत्रे रंगमंदिराचा पडदा आज  उघडल्यामुळे   संपूर्ण एमएमआर रिजनमध्ये नाट्य प्रयोग सुरू करणारे *आचार्य अत्रे हे पहिलेच रंगमंदिर * ठरले आहे. तर २० डिसेंबरला डोंबिवली येथील  सावित्रीबाई फुले नाट्यगृह पुन्हा नाट्य रसिकांच्या सेवेत रुजू होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अत्रे रंगमंदिरातील आसनव्यवस्थेमध्ये बदल करण्यात आले असून, एक खुर्ची सोडून एक  प्रेक्षक बसेल अशाप्रकारे बसण्याची व्यवस्था  अत्रे नाट्य मंदिरात  करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक प्रयोगानंतर नाट्यगृहात सँनिटायझेशन करण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डाँ. विजय सूर्यवंशी यांनी सपत्नीक शनिवारी तु म्हणशील तसं या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला उपस्थिती लावली. 

      या दरम्यान नाट्य प्रयोग सुरु होण्याआधी तु म्हणशील तसं या नाटकातील मुख्य कलाकार संकर्षण कह्राडे यांनी आयुक्तांना पुष्प गुच्छ देत आयुक्तसह त्यांच्या पत्नीचे आभार  मानीत  आयुक्त यांच्या पत्नी कॉलेज जीवनातील नाट्य कलाकार असल्याने त्यांना नाट्यकलेची जाण आहे असे उदगार काढल्यामुळे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्या पत्नी कलाकार असल्याचा सुखद धक्का कल्याणकर नाट्यप्रेमी कला रसिक प्रेक्षकांना यानिमित्ताने बसला.     यावेळी अत्रे रंगमंदिराचे प्रभारी व्यवस्थापक माणिक शिंदे, आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे प्रभारी व्यवस्थापक दत्तात्रय लदवा यांच्यासह  कर्मचारी वर्ग उपस्थित होता. या पहिल्या वहिल्या नाट्य प्रयोगाप्रसंगी सोशल डिस्टन् नियमांचे पालन करीत नाट्य रसिक प्रेक्षकांची उपस्थिती लक्षणीय होती.



दिगंबर वाघ  

कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 🙏 सावधानी बाळगा कोरोना पासून बचाव करा 🙏