डोंबिवली मध्ये कोविड रूग्णालय उभारणार

 डोंबिवली जिमखाना डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलबाबत

कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे आय,सी,यू ची आवश्यकता असणा-या कोविड - १९ साथीच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी डोंबिवली जिमखाना येथे डेडिकेटेड कोवीड हॉस्पीटल दिनांक २२.०८.२०२० पासून सुरू करण्यात आले आहे.डोंबिवली जिमखाना हॉस्पीटल चालविण्यासाठी महापालिकेकडे पुरेसे मनुष्य बळ उपलब्धनसल्याने, सदर कोविड हॉस्पीटलमधे रूग्णांवर उपचार व व्यवथापन करणेकामी मनुष्यबळ

पुरविण्यासाठी मे. ओम साई आरोग्य केअर प्रा. लि. मुंबई या संस्थेला कार्यादेश देण्यात

आलेले आहेत. सदर रूग्णालयामध्ये अद्यापपर्यंत १२८४ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. या रूग्णालयामध्ये संपूर्ण उपचार मोफत उपलब्ध असुन एकूण ५९० रूग्णांची शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे. या रूग्णालयातून उपचार घेऊन बरे झालेल्या नागरीकांनी येथील सेवाबाबत खूप समाधान व्यक्त केले आहे.

       सदर रूग्णालयामधे मनुष्यबळ पुरविणा-या मे. ओम साई आरोग्य केअर प्रा. लि. मुंबई

 या संस्थेला महानगरपालिकेतर्फे नियमित देयके अदा करण्यात येतात. रूग्णालयामधे काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचा-यांना वेतन दिले जात नसल्याबाबत कोणतीही तक्रार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे प्राप्त झालेली नाही. तथापी सदर मे. ओम साई आरोग्य केअर प्रा. लि. या संस्थेच्या संचालकांना, अशा काही तकारी असल्यास त्याचे निराकरण करून अहवाल सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

दिगंबर वाघ

 कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८



🙏सावधानी बाळगा कोरोना पासून बचाव करा🙏