५ किलो प्लास्टिक द्या पोळीभाजी मोफत घ्या

कचरा वर्गीकरण हा शुन्य कचरा मोहिमेचा मुख्य गाभा आहे - रामदास कोकरे उपयुक्त घकव्य

कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : 05 किलो प्लास्टिक दया आणि पोळीभाजी मोफत घ्या ही महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी साकारलेली अभिनव संकल्पना, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, डोंबिवली येथील तृप्ती गृह उदयोगचे राजू कानिटकर आणि सिध्दी वेस्ट टू ग्रीन लिमिटेड या एनजीओच्या माध्यमातून यापुढे राबविली जाणार आहे.

       महापालिकेने दि. 25/05/2020 पासून सुरु केलेल्या  शुन्य कचरा मोहिमेचा कचरा वर्गीकरण हा मुख्य गाभा आहे. नागरिकांकडून ओला कचरा वेगळा केला जातो परंतू सुका कचरा एकत्रित स्वरुपात येत असल्यामुळे तो उपयुक्त ठरत नाही, त्यामुळे सुका कचरा वेगवेगळया स्वरुपात संकलित करण्यासाठी महानगरपालिकेने प्रत्येक रविवारी विविध संकलन केंद्रावरती सुका कचरा संकलित करायची मोहिम सुरु केली आहे. या कच-यातील प्लास्टिक वेगळे करणे महत्वाचे आहे, प्लास्टिक कचरा संकलन मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत असून कचरा हे उत्पन्नाचे साधन झाले आहे. एखादया व्यक्तिने यापुढे 05 किलो प्लास्टिक महापालिकेच्या डोंबिवली पूर्व येथील दत्तनगर सुका कचरा संकलन केंद्रावर जमा केल्यास त्यास पोळी भाजी या आहाराचे कुपन उपलब्ध होणार असून ते कुपन राजू कानिटकर यांचे तृप्ती गृह उदयोग येथे जमा केल्यावर विनाशुल्क पोळीभाजी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे व उप अभियंता मिलींद गायकवाड हे विशेष प्रयत्न करत आहेत. तरी नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा व महापालिकेच्या शुन्य कचरा मोहिमेस सहकार्य करावे, तसेच प्लास्टिक कच-यामध्ये टाकू नये, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.
दिगंबर वाघ             

कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 🙏 सावधानी बाळगा कोरोना पासून बचाव करा 🙏