माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

बोरीवली येथील अटल स्मृती उद्यानाला भेट

राज्यपालांचे अटल बिहारी वाजपेयी यांना जयंतीदिनानिमित्त अभिवादन

मुंबई प्रतिनिधी: भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या 96 व्या जयंतीदिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बोरीवली येथील अटल स्मृती उद्यान येथे जाऊन वाजपेयी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. अटल स्मृती उद्यान परिसराला भेट देऊन राज्यपालांनी समाधान व्यक्त केले. यावेळी खासदार गोपाल शेट्टी, लदाखचे खासदार जाम्यांग छेरिंग नामग्याल, माजी मंत्री विनोद तावडे, आमदार सुनील राणे, भाई गिरकर, योगेश सागर व मनिषा चौधरी तसेच नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.       

         येथील वाजपेयी यांच्या जीवनावरील दृकश्राव्य प्रदर्शनाची पाहणी कोश्यारी यांनी केली . तेथे निर्माण केलेली संसद भवनाची प्रतिकृतीही राज्यपालांनी पहिली तसेच वाजपेयी यांच्या जीवनावरील आभासी प्रश्नमंजुषेत सहभाग घेतला.



दिगंबर वाघ             

कार्यकारी संपादक-९४०४४५३५८  


 🙏 सावधानी बाळगा कोरोना पासून बचाव करा 🙏