हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री अमरावती, औरंगाबाद जिल्ह्यात
मुंबई प्रतिनिधी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या शनिवार 5 डिसेंबर 2020 रोजी हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत. या दौऱ्यात ते अमरावती आणि औरंगाबाद जिल्ह्यातील महामार्गाच्या कामांना प्रत्यक्ष भेटी देणार आहेत.
मुख्यमंत्र्यांचा दौरा
⚫ सकाळी 10.20 वाजता मुंबईहून विमानाने नागपूर विमानतळ येथे आगमन. हेलिकॉप्टरमधून अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खांदेश्वर येथील शिवणी रसुलापूर , मौजे देऊळगव्हाण हेलिपॅड येथे प्रयाण. 11.15 वाजता मोटारीने हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी व राखीव.
⚫ दुपारी 12.15 वाजता हेलिकॉप्टरने औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील मौजे गोळवडीकडे प्रयाण. 2 वाजता गोळवडी हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी व राखीव. दुपारी 3.10 वाजता हेलिकॉप्टरने औरंगाबादकडे प्रयाण. औरंगाबाद येथे आगमन व 3.35 वाजता विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८
🙏 सावधानी बाळगा कोरोना पासून बचाव करा 🙏