विधान भवनात ध्वजारोहण

प्रजासत्ताक दिनानिमित्त विधान भवनात ध्वजारोहण

मुंबई प्रतिनिधी:  भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवन येथे विधानपरिषदेचे सभापती, रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते तसेच विधानसभेचे अध्यक्ष, नाना पटोले व विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी विधानपरिषदेचे सदस्य राजेश राठोड व विधानसभेचे सदस्य पंकज भोयर तसेच विधानमंडळ सचिवालयाचे सचिव राजेंद्र भागवत, विशेष कार्य अधिकारी अनिल महाजन, उप सचिव विलास आठवले, शिवदर्शन साठये, राजेश तारवी, सभापतींचे सचिव महेंद्र काज, अवर सचिव रविंद्र जगदाळे, सुनिल झोरे, उमेश शिंदे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधिमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी, महेश चिमटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.


दिगंबर वाघ             

कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८  


🙏  एक वचन तीन नियम  🙏

) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा