मुंबईकरांसाठी गुड न्यूज! १ फेब्रुवारीपासून

१ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा होणार सुरु

मुंबई  प्रतिनिधी : अखेर बहुप्रतिक्षित मुंबई लोकल सुरू करण्याचा निर्णय सर्वसामान्यांसाठी घेण्यात आला आहे.सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. १ फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सर्वांसाठी खुली करण्यात येणार असल्याची माहीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

        कोरोनाचं संकट अद्याप टळलं नसल्यानं राज्य सरकारनं रेड झोनमधील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता लॉकडाऊन वाढवल्याची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये येत्या २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहे. राज्य सरकारनं याबाबात परिपत्रक जारी केले आहे.  

        लॉकडाऊन वाढवताना राज्य सरकारनं यापूर्वी वेळोवेळी जारी केलेले नियम यापुढेही लागू असतील. गेल्या ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबरला मिशन बिगीन अगेन अंतर्गत काही निर्बंध शिथील करण्यात आले होते. यात परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहेत. मात्र, कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन कायम ठेवला जाणार आहे. नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक,सामाजिक अंतर राखणं गरजेचं,सतत हात धुणे आवश्यक, या सूचनांचं पालन करणं आवश्यक आहे.

दिगंबर वाघ             

       कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


       🙏  एक वचन तीन नियम  🙏

   १) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा