श्रीधर देवलकर आयोजित १२५ वें स्वेच्छा रक्तदान शिबिर संपन्न ,,,
कांदिवली प्रतिनिधी : मीरारोड येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले.यावेळी ७० रक्तदात्यानी रक्तदान केले असून ७० बाटली रक्त जमा झाले. कामगार राज्य विमा योजना रुग्णालयातील सेवा निवृत्त रक्तपेढी विभागाचे तंत्रज्ञ व आयोजक तसेच रक्तदान सहाय्य केंद्र या नोंदणीकृत संस्थेचे संस्थापक रक्तदानाचे प्रणेते श्रीधर बुधाजी देवलकर यांनी मीरारोड येथे रविवार दिनांक २१ / २ / २०२१ रोजी सकाळी ९:००ते १:०० या वेळेत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून कोरोना विषाणूची बाधा झाल्यास बाधित रुग्णांस तत्काळ रक्तकुपी उपलब्ध झाली पाहिजे या रुग्ण हिताच्या दृष्टीने तसेच आरोग्य मंत्री ब मुख्यमंत्री यांचे रक्तदान शिबिर आयोजनाचे आव्हान करण्यापूर्वीच तातडीने स्वेच्छा रक्तदान शिबिर आयोजित करून ७० रक्तकुप्या जमा करून१२५ वे स्वेच्छा रक्तदान शिबिर यशस्वी केले. देवलकर हे गेली ३० वर्षे स्वेच्छा रक्तदानाचे कार्य आपली शासकीय सेवा सांभाळून आपल्या मासिक वेतनातून करीत आहे या स्वेच्छा रक्तदान शिबिराचे वैशिष्ठ असे होते की, सामाजिक अंतर, मास्क अनिवार्य आणि सानिटायझर हे नियम पाळून हे शिबिर यशस्वी करण्यात आले. मी जबाबदार हे मुख्यमंत्री यांनी घोषवाक्य जाहीर केले पण देवलकर यांनी कोरोना बाधित रुग्णां करीता स्वेच्छा रक्तदान शिबिर आयोजित करून मी जबाबदार माझी जबाबदारी हे कृतीने दाखवून दिले आहे.
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
🙏 एक वचन तीन नियम 🙏
१) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा