अभिमानास्पद ! भारतीय वंशाच्या महिला नासाच्या कार्यकारी प्रमुख पदी नियुक्ती

 अभिमानास्पद ! भारतीय वंशाच्या भाव्या लाल यांची नासाच्या कार्यकारी प्रमुख पदावर नियुक्ती

 वॉशिंटन : जगप्रसिद्ध नासा या अंतराळ संशोधन संस्थेत भारतीय वंशाच्या व्यक्तीला कार्यकारी प्रमुख म्हणून निवडण्यात आले आहे.भारतीय वंशाच्या भाव्या लाल यांना अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाच्या कार्यकारी प्रमुख पदावर नियुक्त करण्यात आलं आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भाव्या यांचं नाव नासाच्या कार्यकारी प्रमुख पदासाठी निवडलं आहे. यासंदर्भात नासानेही एक पत्रक जारी करत भाव्या यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली आहे. भाव्या यांची नियुक्ती ही भारतीयांसाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे.

       भाव्या यांना अभियांत्रिकी आणि अवकाश संशोधन या दोन्ही क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा दांडगा अनुभव आहे. मात्र,भाव्या यांच्यावर अशी महत्वाची जबाबदारी टाकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी भाव्या नाच्या इनोव्हेटिव्ह अ‍ॅडव्हान्स कॉन्सेप्ट्स प्रोग्रॅम म्हणजेच नवीन संकल्पनांवर काम करण्यासंर्भातील उपक्रम आणि अ‍ॅडव्हायझरी काऊन्सीलसाठी तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण संकल्पना आणि अभियांत्रिकी सल्लागार समितीच्या सदस्य देखील होत्या.

    भाव्या लाल या नासामधील वरिष्ठ आर्थिक सल्लागार म्हणूनही काम पाहणार आहे. कोणत्या अंतराळ मोहिमांसाठी किती खर्च करण्यात यावा याचसोबत इतर आर्थिक सल्ले देण्याची जबाबदारी आता भाव्या यांच्या खांद्यावर असणार आहे.ही बाब खरोखरंच संपूर्ण भारतीयांसाठी मोठी अभिमानाची बाब आहे.

दिगंबर वाघ             

       कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


         🙏  एक वचन तीन नियम  🙏

    १) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा