लोकलच्या वेळापत्रकावर मुंबईकर नाराज ?

 लोकल वेळापत्रकामुळे प्रवाश्यांमध्ये नाराजी, वेळापत्रकात बदल करण्याची प्रवाश्यांची मागणी

मुंबई प्रतिनिधी :  कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे मार्च २०२० पासून सर्वसामान्यांसाठी बंद झालेली लोकल १ फेब्रुवारीपासून प्रवाश्यांच्या सेवेत रुजू करण्यात आली. पहिल्या दिवशी लोकलला सौम्य प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. दुसऱ्या दिवशी गर्दी वाढ झाली, परंतु आता वेळेचा संभ्रम कायम आहे. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.सर्वसामान्य प्रवाशी तीन टप्प्यांत रेल्वे प्रवास करू शकतात. पहाटे पहिल्या लोकल पासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दुपारी ४ आणि रात्री ९ ते शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करण्यास सरकारने मान्यता दिली आहे.  

               अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता सकाळी ७ ते दुपारी १२ तसेच दुपारी ४ ते ९ या वेळेत प्रवास करण्याची परवानगी सर्वसामान्यांना नाही. रेल्वे प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी ही व्यवस्था केली आहे. दरम्यान मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष मधू कोटीयन यांनी यावर, 'सर्वांसाठी लोकलच्या पहिल्या दिवशी काही लिफ्ट, एस्कलेटरही बंद होते. त्यामुळे गर्दी कमी होती. मात्र, मंगळवारी या सुविधा करण्यात आल्या असून सोमवारी सुरू झालेल्या लोकल सेवेच्या तुलनेत प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. तसेच येत्या काही दिवसांत प्रवासी संख्येत आणखी वाढ होईल,त्यामुळे गर्दी वाढेल,यावर लवकरात लवकर रेल्वेने तोडगा काढावा व वेळापत्रकात बदल करावा', अशी माहिती माध्यमांना दिली आहे.

    लोकल वेळापत्रकामुळे अनेक मुंबईकरांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.यामध्ये बदल व्हावा,अशी मागणी मुंबईकरांकडून केली जात आहे.यावर आता काय तोडगा निघणार हे येणारा काळच सांगू शकेल.

दिगंबर वाघ             

       कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


      🙏  एक वचन तीन नियम  🙏

  १) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा