अन्न व औषध प्रशासनाच्या धाडीत चार कोटी ९८ लाख रुपयांचा खाद्यतेल साठा जप्त
राज्यातील अन्न व्यवसायाचा दर्जा उंचावणे तसेच अन्न व्यावसायीकांना अन्न सुरक्षा व मानके कायदयाच्या तरतुदींचे पालन करण्यासाठी मार्गदर्शन करणे हा देखील धाडीचा अन्य हेतू असतो.१६ जानेवारी, २०२१ शनिवार रोजी अश्याच नियोजनाचा भाग म्हणून मुंबई आणि ठाणे परिसरातील काही खादयतेल व्यवसायांवर धाडी घालण्यात आल्या.
या धाडीत मुंबई परिसरातील 1) मे. आयता एन्टरप्रायजेस प्रा.लि., बोरीवली (पश्चिम), मुंबई-92 2) मे. अष्टमंगल ऑईल मार्केटींग प्रा.लि.,गोरेगाव (पश्चिम), मुंबई -86 व ठाणे परिसरातील 3) मे. सदानंद ऑईल टे्डर्स, वसई, जि. ठाणे,4) मे. गौतम एन्टरप्रायजेस, वाशी, नवी मुंबई, 5) मे. शिवशक्ती एन्टरप्रायजेस, वाशी, नवी मुंबई, 6) मे. गॅलक्सी एन्टरप्रायजेस, काल्हेर, ता. भिवंडी, 7) मे. गुलाब ऑईल अँड फुड इंडस्ट्रिज, वसई (पूर्व), जि. पालघर आणि 8) मे. आशिर्वाद ऑईल डेपो, मिरारोड, जि. ठाणे या आठ खाद्यतेल रिपॅकर्स व घाऊक विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली. सर्व ठिकाणी मिळूण एकूण 4,98,74,973/- (चार करोड अठयान्नव लाख चौ-याहत्तर हजार नऊशे त्र्याहत्तर फक्त) रुपायांचा खादय तेलाचा साठा जप्त करण्यात आला व एकूण 93 खादय तेलाचे नमुने विश्लेषणार्थ घेण्यात आले.
धाडीचा उद्देश व परिणाम तपासता यावा म्हणून प्रथम प्राधान्याने विश्लेषण अहवाल मागवण्यात आले. तपासण्यात आलेल्या नमुन्यापैकी मे. गुलाब ऑईल अँड फुड इंडस्ट्रिज, वसई (पूर्व), जि. पालघर या पेढीतुन घेण्यात आलेल्या 14 पैकी 14 नमुने प्रमाणीत असल्याचे आढळून आले आहे. तसेच घेण्यात आलेल्या एकूण 93 खादयतेलाच्या नमुन्यापैकी अप्रमाणीत दर्जाचे 49 नमुने आढळून आले व 44 नमुने प्रमाणीत दर्जाचे आढळून आले.
एकूण घेतलेल्या शेंगदाणा तेलाच्या 11 नमुन्यापैकी 06 नमुने (54.55 टक्के) अप्रमाणीत असल्याचे आढळून आले.
एकूण घेतलेल्या मोहरी तेलाच्या 19 नमुन्यापैकी 12 नमुने (63.16 टक्के) अप्रमाणीत असल्याचे आढळून आले.
एकूण घेतलेल्या तिळ तेलाच्या 05 नमुन्यापैकी 05 नमुने (100 टक्के) अप्रमाणीत असल्याचे आढळून आले.
एकूण घेतलेल्या सोयाबिन तेलाच्या 11 नमुन्यापैकी 11 नमुने (100 टक्के) प्रमाणीत असल्याचे आढळून आले.
एकूण घेतलेल्या सुर्यफुल तेलाच्या 20 नमुन्यापैकी 12 नमुने (60.00 टक्के) अप्रमाणीत असल्याचे आढळून <span lang="HI" style="font-size: 12.0pt; font-family: DVOT-SurekhMR; mso-ansi-language: EN-US; mso-bidi-language: HI;" data-mce-style="font-size: 12.0pt; fon
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
🙏 एक वचन तीन नियम 🙏
१) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा