कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करा - डॉ.विजय सुर्यवंशी आयुक्त
कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क परिधान न केलेल्या 357 व्यक्तींकडुन गेल्या तीन दिवसांत रु.1,78,400/- इतका दंड वसूल ! कल्याण डोंबिवली महापालिका क्षेञात कोरोना साथीच्या वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिका अनेकविध प्रयत्न सातत्याने करीत आहे, या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, महापालिकेच्या सर्व प्रभाग परिसरात सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्क वा कापड परिधान न करणा-या व्यक्तींविरुद्ध दंडाची कारवाई महापालिकेने जोमाने सुरु ठेवली आहे.
19/02/2021 ते 21/02/2021 या तीन दिवसांत केलेल्या या कारवाईत, मास्क वा कापड परिधान न केलेल्या 357 व्यक्तींना एकूण रुपये 1,78,400/- इतका दंड आकारण्यात आला आहे.
सध्याचा काळ हा लग्न सराईचा असल्यामुळे, बाहेर विशेषत: गर्दीच्या ठिकाणी कुठल्याही समारंभात वावरतांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन तसेच मास्क अथवा कापड परिधान करणे अत्यावश्यक आहे, सार्वजनिक ठिकाणी वावरतांना अथवा बाजारात, किराणा दुकान, मॉल या ठिकाणी जातांना नागरिकांनी मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
🙏 एक वचन तीन नियम 🙏
१) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा