नियम मोडणाऱ्या वर आता होणार कारवाई

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची कल्याण पश्चिम येथील भाजी मार्केट येथे अचानक भेट !

कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कल्याण डोंबिवली परिसरात कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज अचानक कल्याण पश्चिम येथे रेल्वेस्थानकालगतच्या भाजी मंडई आणि तेथील दुकानांत भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. भाजी मंडई मध्ये  नागरिकांना,विक्रेत्यांना मास्क  परिधान करणेबाबत सूचना दिल्या. महापालिका क्षेत्रात सद्या कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे यासाठी मार्केट परिसरात नागरिक,विक्रेते मास्क वापरतात की नाही याची पाहणी करण्यासाठी मार्केटला अचानक भेट दिली असे त्यांनी यावेळी सांगितले. यासाठी महापालिकेने  पथक नेमले असून हे पथक दररोज मास्क परिधान न करणाऱ्या लोकांविरुद्ध दंडनीय कारवाई करणार आहे,त्याचप्रमाणे मॅरेज हॉल व समारंभाच्या ठिकाणी पाहणी करुन नियम भंग केलेला आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

         नागरिकांना घराबाहेर पडताना मास्क घातल्याशिवाय बाहेर पडू नये ,सोशल डिस्टंसिंग पाळावे,वयोवृद्ध नागरिकांनी शक्यतोवर घराबाहेर पडू नये , कोविडचा सामना आपण 9 ते 10 महिने चांगल्या रीतीने केला आहे आता नागरिकांनी, दुकानदारांनी स्वतः खबरदारी घ्यावी आणि आपली जबाबदारी ओळखून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केले. यासमयी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, महापालिका सचिव संजय जाधव, क प्रभागक्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे, सहा.जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे इ. अधिकारी वर्ग त्यांच्या समवेत होता.

दिगंबर वाघ             

    कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८ 


      🙏  एक वचन तीन नियम  🙏

 १) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा