ठाण्यातील खारजमीन क्लस्टर साठी देणार

 ठाण्यातील खारभूमीची जमीन क्लस्टरसाठी देण्याचा निर्णय- पालकमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे प्रतिनिधी : ठाण्यातील खारभूमीची जमीन क्लस्टरसाठी देण्याचे मान्य करण्यात आले असून क्लस्टर योजनेला गती देण्याची प्रक्रिया त्वरित रावबविण्यात यावी, असे निर्देश ठाणे

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे  यांनी आज प्रशासनाला दिले.

   ही बैठक नेपियन्सी रोड येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ येथे मंगळवारी संपन्न झाली. यावेळी ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, ठाणे जिल्ह्याचे नगर रचना उपसंचालक अशोक पाटील व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

क्लस्टर प्रकल्पातील नागरिकांच्या पुनर्वसनाचा  प्रश्न सोडवणार

याबाबत अधिक माहिती देताना मंत्री श्री शिंदे म्हणाले की, ठाणे येथील जलसंपदा विभागाचे कार्यालय व खारभूमी विभागाची जमीन याचा क्लस्टर अंतर्गत पुनर्विकास करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या अनुषंगाने संबंधित विषयाचा आढावा घेऊन प्रस्ताव ठाणे महापालिकेने  एमएसआरडीसीकडे सादर करावा. तसेच संबंधित जमिनीवर राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्विकासाचा प्रश्न पहिल्यांदा सोडवा असे निर्देश ही नगरविकास मंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

दिगंबर वाघ
           कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८