कल्याण-डोंबिवली परिसरात सोडियम हायपोक्लोराइड फवारणी

कोरोना साथीच्या  वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका परिसरात  सोडियम हायपोक्लोराइड  फवारणीच्या विशेष मोहिमेचे आयोजन!

कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोना साथीच्या वाढत्या प्रादुर्भाव  आळा घालण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत, याच उपाययोजनांचा  एक भाग म्हणून महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार,  घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी शनिवारी आणि रविवारी महापालिका क्षेत्रात सोडियम हायपो क्लोराइड  फवारणीची  विशेष मोहीम हाती  घेतली आहे.

    महापालिकेच्या अ,ब व क प्रभाग क्षेत्र परिसरात आज सकाळी 7.00 ते दु. 2.00 या वेळेत ही मोहीम राबविली  गेली, दुपारच्या सत्रात 3.00 ते रात्री 10.00 या वेळेत डोंबिवली मधील फ ,ग व ई या प्रभागक्षेत्रात ही मोहीम राबविण्यात येत आहे . तसेच उद्या रविवार दिनांक11 एप्रिल रोजी सकाळी  7.00 ते दु .2.00 या वेळेत कल्याणमधील ड व जे प्रभागक्षेत्रात आणि दुपारी 3.00 ते रात्री 10.00 या वेळेत आय व ह प्रभागक्षेत्रात ही  फवारणी करण्यात येणार आहे .याकरिता अकरा सिटी गार्ड वाहने ,7 फायर फायटर वाहने तसेच  प्रत्येक प्रभागनिहाय हॅन्ड फॉग मशीनचा वापर करण्यात येत आहे.

    सदर मोहिमेसाठी सहा सार्वजनिक अधिकारी घुटे, सर्व मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८