कामगारांच्या समस्या निवारणासाठी नोडल अधिकारी नियुक्त

मुंबई प्रतिनिधी : कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील व इतर राज्यातील कामगारांकडून प्राप्त होणाऱ्या विविध तक्रारीं संबंधात कार्यवाही व्हावी, याकरिता मुंबई येथील कामगार आयुक्त कार्यालय व मुंबई शहर कार्यालयाकरिता नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.नोडल अधिकारी यांनी राज्यातील व इतर राज्यातील स्थलांतरीत कामगारांकडून होणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने सर्व संबंधीतांशी समन्वय साधून कार्यवाही करावयाची आहे.

          नोडल अधिकारी यांची माहिती  सतिश तोटावार, सहाय्यक कामगार आयुक्त, भ्रमणध्वनी क्र. 9960613756 ई-मेल adclkokandivision@gmail.com. मंगेश झोले, सरकारी कामगार अधिकारी, भ्रमणध्वनी क्र. 8451846222  प्रविण जाधव, सहाय्यक कामगार आयुक्त, भ्रमणध्वनी क्र. 8329695218  ई-मेल dyclmumbaicity gmail.com कामगार आयुक्त कार्यालय, मुंबई (मुंबई मुख्यालय) मुंबई शहर कार्यालय, मुंबई.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८