के.डी.एम.सी.ने २० दिवसांत विना मास्क फिरणाऱ्यांकडून १२,०६,५०० केले वसूल

मास्क परिधान न केलेल्या 2413 व्यक्तींकडून गेल्या 20 दिवसात रु.12,06,500/- इतका दंड वसूल ! 
 कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कल्याण-डोंबिवली परिसरात कोरोनाची साथ नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने महापालिका दररोज विना मास्क फिरणा-या लोकांवर कारवाई करत असूनही अजून काही नागरिक रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी फिरतांना मास्क न घालत फिरत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वीस दिवसांत (1 एप्रिल ते 20 एप्रिल) घराबाहेर विना मास्क फिरणा-या 2413 व्यक्तींकडून महानगरपालिका कर्मचारी पथकाने पोलिसांच्या मदतीने रु.12,06,500/- इतका दंड वसूल केला आहे.

         काल दिवसभरात देखिल एकुण 126 व्यक्तीकडून रु.63,000/- इतका दंड वसूल करण्यात आला आहे, तरी नागरिकांनी घराबाहेर, सार्वजनिक ठिकाणी  वावरतांना न चुकता मास्क परिधान करण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८