कोविड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी - विजय वडेट्टीवार मंत्री
मुंबई प्रतिनिधी : कोविड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी विभागीय आयुक्तांना 176 कोटी 29 लाख पाच हजार रुपये निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. वडेट्टीवार म्हणाले, कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी विभागीय आयुक्त कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची मानके व बाबीनुसार केलेला खर्च भागविण्यासाठी या कार्यालयांकडून प्राप्त झालेल्या शिफारशी व राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या बाबीविचारात घेऊन राज्य कार्यकारी समितीने दिलेल्या मान्यतेनुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून रु. 176,29 ,05,000/- (रुपये एकशे शहात्तर कोटी एकोणतीस लाख पाच हजार) इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यामध्ये विभागीय आयुक्त कोकणसाठी 1613.84 लाख रुपये, विभागीय आयुक्त
पुणेसाठी 2810 .79 लाख रूपये, विभागीय आयुक्त नाशिक साठी 4199.31 लाख रूपये , विभागीय आयुक्त औरंगाबाद साठी 6154. 93 लाख रूपये,विभागीय आयुक्त अमरावती साठी 2091. 10 लाख रूपये आणि विभागीय आयुक्त नागपूर साठी 759. 08 लाख रुपये वितरीत करण्यात आले आहेत. हा निधी कोविड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी वितरित करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८