नूतनीकरण केलेल्या जिजामाता नगर दवाखाना व आरोग्य केंद्राचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण -महापौर किशोरी पेडणेकर व खासदार अरविंद सावंत यांची विशेष उपस्थिती
मुंबई प्रतिनिधी : जी/दक्षिण विभागातील जी /दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष व स्थानिक नगरसेवक दत्ता नरवणकर यांच्या प्रयत्नाने जिजामाता नगर येथील नूतनीकरण केलेल्या जिजामाता नगर दवाखाना व आरोग्य केंद्राचे लोकार्पण मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पर्यावरण मंत्री तथा स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते फित कापून आज दि.२७ मे २०२१ रोजी पार पडले. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमाला बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर, माजी आमदार सचिन अहिर, माजी आमदार सुनील शिंदे, जी /दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे तसेच संबंधित वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी, मान्यवरांनी संपूर्ण आरोग्य केंद्राची पाहणी करून संबंधित डॉक्टरांशी चर्चा केली. या आरोग्य केंद्रामध्ये बाह्यरुग्ण चिकित्सा, उच्च रक्तदाब व मधुमेह तपासणी, रेबीज विरोधी लस, धनुर्वात प्रतिबंधक लस तसेच सामान्य लसीकरण व कोरोनाबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या आरोग्य केंद्रांमध्ये एकूण ३५ कर्मचाऱ्यांचा स्टाँफ कार्यरत राहणार असून उल्लेखित केलेल्या सेवा नियमितपणे देण्यात येणार आहे.
दिगंबर वाघ कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८