खाजगी आस्थापनांनी सी.सी.टी.व्ही. कॅमेरा लावणे

 खाजगी आस्थापनांनी सी.सी.टी.व्ही. कॅमेरा लावणे संदर्भात बृहन्मुंबई पोलिसांचे आदेश निर्गमीत

मुंबई प्रतिनिधी : बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील खाजगी आस्थापनावर  सी. सी. टी. व्ही. कॅमेरा लावणे संदर्भात बृहन्मुंबई पोलिसांनी आदेश निर्गमीत केले आहेत. या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी असे निर्देश पोलिस उप आयुक्त (ऑपरेशन) तथा कार्यकारी दंडाधिकारी एस. चैतन्य यांनी दिले आहे. पोलिस तपास तसेच गुन्हा नियंत्रण व गुन्ह्यांची उकल होण्यासाठी सी.सी.टी.व्ही फुटेजचा मोठा उपयोग होवू शकतो. त्या संदर्भात खाजगी आस्थापनाने सी.सी.टी.व्ही. लावावेत असे निर्देश देण्यात आले होते. त्यानूसार अद्यापही काही खाजगी आस्थापनांनी  सी.सी.टी.व्ही. कॅमेरा लावलेला नाही. त्यानूसार पुढील निर्देशीत खाजगी आस्थापना 1) बँक, 2)एटीएम, 3)वित्तीय संस्था, 4) ज्वेलरी शॉप, 5) हॉटेल, 6) विश्राम गृह, 7) रेस्टॉरंट, 8) बार व पब, 9) वाईन व बियर शॉप, 10) निवासी संकूल, 11) कार्यालय इमारत, 12) नवीन तसेच बांधकामाधीन निवासी संकूल/कार्यालय, 13)पेट्रोलपंप, 14)शॉपिंग मॉल, 15)शॉपिंग कॉम्पलेक्स, 16) सुपर मार्केट, 17) जिम, 18) खेळाची मैदान, 19) चित्रपटगृह व कॉम्पलेक्स, 20)शैक्षणिक संकूल, 21) प्रार्थना स्थळे, 22) दवाखाने, 23) पुतळ्यांच्या सुरक्षा व देखभालीसाठी नेमलेल्या संस्था/संघटना    यात आदींचा समावेश आहे.

    या खाजगी आस्थापनांनी साधारणत: 50 मीटर पर्यंतचा त्यांचा परिसर रेकॉर्ड होईल असे कॅमेरे लावावेत. तसेच ते सुस्थितीत असतील याची खात्री करावी. त्याची चित्रीकरण यंत्रणा उत्तम प्रतिची तसेच कमीत कमी 15 दिवसांचे रेकॉर्डींग होईल अशी असावी. पोलिसांनी मागणी केल्यास सदरील रेकॉडींग पोलिसांना द्यावी. तसेच काही संशयास्पद आढळून आल्यास त्यांची कल्पना जवळच्या पोलिस स्टेशनला द्यावे. सदरील निर्देश दि.12 मे 2021 ते 10 जुलै 2021 या कालावधीसाठी आहेत,असेही या आदेशात म्हटले आहे.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८