कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कल्याण डोंबिवली महापालिकेने 9 ते 12 जून दरम्यान अतिवृष्टी होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असल्याने महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानूसार दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेच्या मालमत्ता विभागाने काल रात्री कल्याण शिळरोड वरील दुभाजकांमध्ये असलेली 7 व इतर 3 अशी 10 होर्डिंग्स मोकळी केली आजही दिवसभरात कल्याण मधील ड प्रभागक्षेत्रात प्रभागक्षेत्र अधिकारी सुधिर मोकल यांनी मालमत्ता विभागाच्या सहकार्याने तसेच महापालिका पोलिस अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने आणि 1 जेसीबी, 1 हायड्रा व 1 गॅस कटर चा वापर करुन तिसगाव नाका येथील 25 X 20 चौ.फुटाचे 1 होर्डिग आणि नितिन राज हॉटेल समोरील 15 X 18 चौ.फुटाचे 1 होर्डिग निष्काशीत करण्याची धडक कारवाई केली.
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८