महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनात पावसाळाविषयक आढावा बैठक संपन्न

 

 मुंबई प्रतिनिधी : महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पावसाळाविषयक बाबींची आढावा बैठक आज आयोजित करण्यात आली होती. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे)  आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) . पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, 'बेस्ट' उपक्रमाचे महाव्यवस्थापक  लोकेश चंद्रा यांच्यासह संबंधित सह आयुक्त, उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर मुंबई पोलीस, मध्य व पश्चिम रेल्वे, म्हाडा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई मेट्रो इत्यादी संस्थांचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते.

आजच्या बैठकी दरम्यान चर्चिले गेलेले प्रमुख मुद्दे व संबंधित आदेश याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे आहेत:

•  बैठकीच्या सुरुवातीला महापालिका क्षेत्रातील नालेसफाई व पर्जन्य जल वाहिन्यांच्या पावसाळापूर्व कामांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे उपस्थितांना देण्यात आली. या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त महोदयांनी नालेसफाईनंतर काढण्यात आलेला गाळ हा तातडीने हटविण्याचे व निर्धारित ठिकाणी हलविण्याचे आदेश दिले. या बाबत माहिती देताना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांनी सांगितले की, नालेसफाईची कामे ही नियोजनांनुसार करण्यात येत आहेत. 

•  वरील अनुषंगाने महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये पर्जन्य जल वाहिन्या खात्याच्या चमुसह इतर सर्व चमू सुसज्ज व तैनात आहेत. तसेच ज्या परिसरांमध्ये पाण्याचा निचरा कमी वेगाने होत असल्याचा अनुभव आहे, अशा सर्व ठिकाणी उदंचन संच (De-watering Pump) बसविण्यात आले असून डिझेलचा पुरेसा साठा असल्याची खातरजमा वेळोवेळी करण्यात येत आहे. याबाबत सर्व विभागांमध्ये रंगीत तालिम (Mock Drill) देखील घेण्यात आली आहे.

•  महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये ज्या-ज्या ठिकाणी पावसाळी जाळ्या (Water Entrance) आहेत, तसेच ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा संथ गतीने होतो, अशा परिसरांमध्ये असणा-या पावसाळी जाळ्या (Water entrence); इत्यादींची तपासणी विभाग स्तरावर वेळोवेळी करण्यात यावी. त्याचबरोबर पावसाळी जाळ्यांबाबत साफसफाई, दुरुस्ती, परिरक्षण आदी जी कामे करणे गरजेचे असेल, ती कामे देखील वेळोवेळी व वेळेत करवून घ्यावीत, असे निर्देश महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकीदरम्यान दिले. 

•  महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये ज्या-ज्या ठिकाणी 'मॅनहोल' आहेत, तसेच ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा संथ गतीने होतो, अशा परिसरांमध्ये असणारे 'मॅनहोल'; इत्यादींची तपासणी विभाग स्तरावर वेळोवेळी करण्यात यावी. त्याचबरोबर याबाबत साफसफाई, दुरुस्ती, परिरक्षण आदी जी कामे करणे गरजेचे असेल, ती कामे देखील वेळोवेळी व वेळेत करवून घ्यावीत, असे निर्देश महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकीदरम्यान दिले. 

• गेल्यावर्षीच्या पावसाळ्यादरम्यान मुंबई सेंट्रल परिसरातील नायर रुग्णालय व 'बी' विभाग कार्यक्षेत्रातील जे. जे. रुग्णालय; या २ महत्त्वाच्या व मोठ्या रुग्णालयांमध्ये काही प्रमाणात पाणी साचल्याचे निदर्शनास आले होते. ही बाब लक्षात घेता, या दोन्ही रुग्णालयांच्या स्तरावर पाण्याचा निचरा योग्यप्रकारे होत असल्याची व्यवस्था सक्षम असल्याची खातरजमा वेळोवेळी करवून घेण्याचे निर्देशही महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकीदरम्यान दिले. याच पद्धतीने जम्बो कोविड रुग्णालयांच्या स्तरावर कार्यवाही करणे. नायर व जे. जे. रुग्णालयांबाबत संबंधीत सह आयुक्त / उप आयुक्त यांच्या स्तरावर सर्व संबंधीत यंत्रणासोबत वेळोवेळी आढावा बैठक घेऊन कार्यवाही करण्याचे निर्देश. 

•  सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या कार्यक्षेत्राची दररोज पाहणी करावी. या अंतर्गत पावसाळाविषयक कार्यवाही, नालेसफाई, मॅनहोल, वृक्ष व वृक्ष छाटणी इत्यादींची कामे व्यवस्थित व वेळेत होत आहेत याची नियमितपणे पाहणी करण्याचे निर्देश. 

•  महापालिका क्षेत्रात कार्यरत असणा-या विद्युत वितरण कंपन्यांनी काही खोदकाम केले असल्यास सदर बाबत खोदलेल ठिकाणी पूर्ववत करवून घेण्याची कार्यवाही वेळेत व योग्यप्रकारे करण्याचे निर्देश. 

•  मुंबई मेट्रोची कामे ज्या ठिकाणी सुरु आहेत, त्या ठिकाणी योग्यप्रकारे बॅरिकेड्स लावून घेण्याची कार्यवाही योग्यप्रकारे झाली असल्याची खातरजमा करवून घेण्याचे निर्देश. 

•  महापालिकेच्या सर्व ७ मंडळांचे उप आयुक्त / सह आयुक्त यांनी त्यांच्या स्तरावर मुंबई मेट्रो, एम. एम. आर. डी. ए., म्हाडा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई पोलीस, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि संबंधीत संस्थांसोबत संयुक्त बैठकांचे तातडीने आयोजन करण्याचे व आवश्यक ती समन्वयनात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश. 

•  बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींबाबत आवश्यक ती कार्यवाही सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार (SoP) तातडीने करवून घेण्याचे निर्देश. तसेच म्हाडाच्या अखत्यारितील इमारतींबाबत देखील योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश. 

•  आपत्कालीन व्यवस्थापनाचा भाग म्हणून सर्व २४ विभागात तात्पुरत्या निवा-यांची व्यवस्था करणे. सदर ठिकाणची संभाव्य गरज लक्षात‌ घेऊन अन्न व पाण्याच्या व्यवस्थेचे नियोजन करण्याचे निर्देश

•  मुंबई अग्निशमन दलाच्या स्तरावर करण्यात आलेल्या उपाययोजना व नियोजन याबाबत वेळोवेळी आढावा घेण्याचे प्रमुख अग्निशमन अधिकारी यांना निर्देश.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८