छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला देशाच्या इतिहासात फार महत्व आहे.

शिवराज्याभिषेक म्हणजे देशवासीयांचा पहिला स्वातंत्र्यदिवस मानला जातो. 

मुंबई प्रतिनिधी ६ जून १६७४ रोजी किल्ले रायगडावर महाराजांचा पहिला राज्याभिषेक संपन्न झाला. त्यानंतर काही काळातच २४ सप्टेंबर १६७४ रोजी महाराजांनी आपला दुसरा राज्याभिषेक करवून घेतला. पहिल्या राज्याभिषेकाइतकेच दुसऱ्या राज्याभिषेकालाही महत्व आहे. या ऐतिहासिक दिवसाची आठवण ठेऊन त्या इतिहासाचा जागर करणे हे शिवप्रेमी म्हणून आपले कर्तव्य आहे.

       संभाजी ब्रिगेडने सुरु केलेला ६ जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा आता लोकोत्सव बनला आहे. त्याच पद्धतीने संभाजी ब्रिगेड गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी २४ सप्टेंबर या दिवशी महाराजांचा द्वितीय राज्याभिषेक सोहळा साजरा करत आहे. महाराजांचा द्वितीय राज्याभिषेक कोणत्या पद्धतीने झाला यावरुन सुरु असणाऱ्या वादात न पडता या ऐतिहासिक दिवसाचे महत्व टिकून राहिले पाहिजे हा आमचा आग्रह आहे.

  यंदाही मराठा सेवा संघ - संभाजी ब्रिगेडच्या वतीने २४ सप्टेंबर २०२१ रोजी किल्ले रायगडावर महाराजांचा ३४८ वा द्वितीय शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. कोविड १९ व प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन हा उत्सव साजरा केला जाणार आहे.

ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८