रविवार दि. १३.६.२०२१ रोजी मेगा ब्लॉक मध्य रेल्वे
कल्याण येथून सकाळी १०.३७ ते दुपारी ३.५१ या वेळेत सुटणारी अप धीम्या /अर्धजलद सेवा कल्याण व मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविल्या जातील व डोंबिवली, दिवा, ठाणे स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्टेशन येथे अप धिम्या मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील. या गाड्या वेळापत्रकापेक्षा १० मिनिट उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील. पनवेल-वाशी अप व डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते संध्याकाळी ४.०५ दरम्यान (बेलापूर / नेरुळ-खारकोपर सेक्शन सह) अप हार्बर मार्गावरील पनवेल/बेलापूर येथून सकाळी १०.४९ ते संध्याकाळी ४.०१ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणा-या सेवा व
डाऊन हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ दरम्यान बेलापूर/पनवेल करीता सुटणा-या सेवा रद्द राहतील. अप ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा ठाणे करीता पनवेल येथून सकाळी ९.०१ ते दुपारी ३.५३ पर्यंत सुटणा-या सेवा आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील पनवेल करीता ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत सुटणा-या सेवा रद्द राहतील. बीएसयू अप मार्गावर खारकोपर येथून सकाळी १०.४५ ते संध्याकाळी ४.०० वाजेपर्यंत नेरुळ/बेलापूरसाठी सुटणारी सेवा आणि बीएसयू डाऊन मार्गावर नेरुळ/बेलापूरसाठी येथून सकाळी १०.१५ ते दुपारी ३.३२ या वेळेत सुटणारी सेवा रद्द राहतील.ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- वाशी विभागात विशेष गाड्या चालवल्या जातील.
ब्लॉकच्या कालावधीत ठाणे- वाशी / नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.पायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगा ब्लॉक आवश्यक आहेत. प्रवाशांना होणा-या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.