"आम आदमी पार्टी"च्या वतीने के.डी.एम.सी. आयुक्त , उपायुक्त घनकचरा विभाग, आरोग्य विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ , तहसीलदार कार्यालय कल्याण व इतर ठिकाणी पत्रव्यवहार करून उंबर्डे येथील घनकचरा प्रकल्प त्वरित बंद करूण मानवी लोकवस्ती पासून दूर ओसाडमाळ राणावर स्तलांतरित करण्याबाबत निवेदन दिले आहे.
⚫ भातशेतीचे जे नुकसान झाले आहे त्याची नुकसाभरपाई त्वरित मिळावी या साठी ही के.डी.एम.सी. कडे पाठपुरावा चालू आहे. - रुपेश पाटील कल्याण शहर उपाध्यक्ष आम आदमी पार्टी
⚫ मुळात कोणतेही डम्पिंग ग्राउंड नवीन सुरू करताना त्या साइटवर गेल्या शंभर वर्षात पुराचे पाणी आलेले नाही अशी साइटच फक्त बायोगॅस प्लांट किंवा डम्पिंग साठी घेता येते. ज्याअर्थी उंबर्डे व बारावे या डम्पिंग वर सद्यस्थितीत कचरा टाकता येत नाही याचाच अर्थ या ठिकाणी पुराचे पाणी भरले आहे. मुळात केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या निकषाप्रमाणे ही बाब बेकायदेशीर आहे. जर पुराचे पाणी आजमितीस या दोन्हीही डम्पिंग वर भरलेले असेल तर या ठिकाणी केलेले कचऱ्याचे संकलन हे पूर्णपणे बेकायदेशीर ठरते. हीच बाब मी प्रशासनाच्या निदर्शनास लेखी स्वरूपात आणून दिलेली होती. - श्रीनिवास घाणेकर ज्येष्ठ समाजसेवक
⚫ उंबर्डे घनकचरा प्रकल्पाची क्षमता ३५० मेट्रिक टन असून याठिकाणी टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण खूप कमी आहे सध्या या ठिकाणी २५० मेट्रिक टन कचरा टाकण्यात येतो डोंबिवली ते टिटवाळा येथील घनकचरा प्रकल्प सुरू झाल्यानंतर भविष्यात कचरा खूपच कमी राहील. - रामदास कोकरे उपायुक्त केडीएमसी