पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त व पदाधिकारी यांची महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पांना भेट !
महापालिकेच्या शुन्य कचरा (Zero Garbage Mission ) मोहिमेच्या अनुषंगाने राज्याच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे निर्देशानुसार काही दिवसांपूर्वी राज्यातील15 महापालिका आयुक्तांसमोर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुन्य कचरा (Zero Garbage Mission ) मोहिमेबाबत सादरीकरण (Presentation) केले. सदर सादरीकरण पाहून काही आयुक्तांनी महापालिकेच्या या कार्यप्रणालीची पाहणी करण्याची इच्छा दर्शविली. त्यानुसार काल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती नितीन लांडगे व इतर स्थायी समिती सदस्य, पक्षनेता नामदेव ढाके, मनसे गटनेता सचिन चिखले, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी आधारवाडी डंम्पींग ग्राऊंड, बारावे घनकचरा प्रकल्प तसेच विविध इमारतींमध्ये केल्या जाणा-या खत निर्मिती प्रकल्पाची पाहणी केली आणि महापालिकेत कच-याचे कशा प्रकारे वर्गिकरण केले जाते याची माहिती घेतली. महापालिकेचे हे प्रकल्प पाहून आपण प्रभावित झालो असून पिंपरी चिंचवड महापालिकेतही अशाप्रकारे शुन्य कचरा मोहिम राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.