माहिती व जनसंपर्कचे शिष्टमंडळ
मुंबई प्रतिनिधी : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ हे नोव्हेंबर 2019 मध्ये इस्त्राईल दौऱ्यावर गेले होते. याबाबत माध्यमांमध्ये विपर्यस्त वृत्त प्रसिद्धीस येत आहेत. परंतु, हे शिष्टमंडळ इस्त्राईलचे भारतातील कौन्सुलेट जनरल, मुंबई यांच्या निमंत्रणानुसार महाराष्ट्र शासनाची परवानगी घेऊन इस्त्राईल दौऱ्यावर गेले होते, असा खुलासा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात येत आहे. सदरील दौऱ्यामध्ये
⚫ शासकीय जनसंपर्कातील नवे प्रवाह
⚫ सोशल मीडिया डिजिटल मार्केटिंग साधनांचा वापर
⚫ वेब मीडियाचा जनसंवादासाठी वापर
⚫ डिजिटल मार्केटिंग साधनांचा वापर करून शासनाच्या विविध विभागांबरोबर समन्वय
⚫ आपत्कालीन स्थितीत किंवा एखाद्या मोठ्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या वेळी माध्यमांचा उपयोग
⚫ शासनाचे संदेश जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सर्वसमावेशक माध्यम आराखडा
⚫ स्मार्ट सिटीमध्ये शासकीय जनसंपर्काची भूमिका
⚫ सायबर गुन्हे रोखण्यसाठी घ्यावयाच्या दक्षतेबाबत केलेली जनजागृती
⚫ पर्यटन वृद्धीसाठी राबविलेल्या माध्यम उपक्रमांच्या यशकथांचा अभ्यास
⚫ ग्रामीण आणि दुर्गम भागातील जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी नव्या माध्यमांचा वापर
या बाबींवरील प्रशिक्षणाचा समावेश होता.
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


