भारतीय सैन्यदलातील माजी अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ तसेच समाजसेवक सन्मानित
अलीकडच्या काळात देशात तौक्ते वादळ, भूस्खलन, अतिवृष्टी व कोरोनासारखी संकटे आली. या सर्व संकटप्रसंगी नागरिकांनी तसेच डॉक्टर्स, पोलीस, स्वच्छता कर्मचारी, शेतकरी यांनी परस्परांना सहकार्य केल्यामुळे या संकटांना देश धैर्याने सामोरा गेला, असे राज्यपालांनी सांगितले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी आर्मी डेंटल कोरच्या वीर नारी डॉ. कांता मुखर्जी, हुतात्मा ले. कमांडर फिरदौस मोगल यांच्या पत्नी वीर नारी कर्झीन मोगल, ग्रुप कॅप्टन त्रिलोकी भटारा, सुभेदार विनायक उपाध्ये, मास्टर चीफ एम. प्रसाद, मेजर प्रांजल जाधव, कॅप्टन के. पी. हरिदासन, कमांडर विजय वधेरा, सार्जंट दत्तात्रय अर्जुन उतेकर, कमोडोर बी. बी. मिस्त्री यांना मातृभूमी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रॅन इंटरनॅशनल समूहाच्या प्रमुख डॉ. ग्रेस पिंटो, मायाशंकर चौबे, पियुश शुक्ला, सौरभ पांडे यांना शिक्षण भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
युगाराज जैन यांना साहित्य भूषण तर राजाभाऊ सेठ, डॉ मुकेश गौतम, प्रशांत फुलवणे, प्रविण राय व कमलेश नाहर यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. प्रकाश जाधव, डॉ बालनाथ चकोर, डॉ आनंद पांडे, वेदिका चौबे व उमेश पांडे यांना सेवा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.