15 सप्टेंबर रोजी अधिसूचना; 4 ऑक्टोबर रोजी मतदान
स्व. सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेची मुदत दि. 2 एप्रिल, 2026 पर्यंत आहे. या पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी केल्याच्या दिनांकापासून बुधवार दि. 22 सप्टेंबर, 2021 पर्यंत नामनिर्देशन दाखल करता येणार आहे. दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. 23 सप्टेंबर रोजी केली जाणार असून उमेदवारांना सोमवार दि. 27 सप्टेंबर, 2021 पर्यंत नामनिर्देशन मागे घेता येईल. सोमवार दि. 4 ऑक्टोबर, 2021 रोजी सकाळी 9 वा. ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान घेतले जाणार असून त्याच दिवशी सायं. 5 वा. मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत.या निवडणुकीप्रसंगी कोव्हीड-19 विषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत.