मच्छिमार व्यावसायिकांना नुकसान भरपाई देणार ?

शेतकऱ्यांप्रमाणे पिक विमा द्या मच्छीमार व्यावसायिकांची मागणी अन्यथा आंदोलन करावे लागेल -चंद्रकांत लाडे उपशहर प्रमुख

कन्नड प्रतिनिधी : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक तलाव धरणे ओव्हरफ्लो झाले असल्यामुळे अनेक ठिकाणी आथोनाथ नुकसान झाले आहेत. ढग फुटी सारखी या तालुक्यामध्ये परिस्थिती झाली आहे  धरणाचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून काही धरणे फुटली आहेत. शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमार यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांप्रमाणे पिक विमा देण्याची मागणी आता मच्छीमार संघटनेने केली आहे अन्यथा अनेक मच्छीमार बेरोजगार होतील अशी परिस्थिती आहे मच्छीमार संघटनेची मागणी शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करून कर्जमाफी दिली जाते त्याप्रमाणे मच्छीमारांना जीवनदान द्यावे अशी मागणी केली आहे मच्छीमार बीच निविष्ठा हेक्‍टरी रूपये ८२०० प्रमाणे मिळावी अशीही मागणी आहेत.

     अशा प्रकारचे निवेदन शिवसेनेच्या वतीने कन्नड तहसीलदार यांना देण्यात आले आहेत. यावेळी निवेदन देण्यासाठी शिवसेना उपशहरप्रमुख चंद्रकांत लाडे यांच्यासह शहर प्रमुख सुनील पवार उपतालुका प्रमुख शिवाजी थेटे शेख असिफ शेख मोहम्मद नारायण पवार चेतन पवार रामेश्वर राठोड पोपट मोरे महादू चौहान पन्नालाल बिरोटे अंकुश वानखेडे अंकुश पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८