कॉमन सर्विस सेंटर आणि एच.पी. गॅस सुविधा केंद्राचे उद्घाटन.

गुहागर तालुक्यात मुसलोंडी येथे प्रथमच कॉमन सर्विस सेंटर आणि एच.पी. गॅस सुविधा केंद्राचे उद्घाटन.

गुहागर प्रतिनिधी : सप्टेंबर मुसलोंडी या गावी प्रथमच कॉमन सर्विस सेंटर चे उद्घाटन नरवण ग्रापंचायत सरपंच मा. श्रीयुत प्रवीण वेल्हाळ यांच्या हस्ते करण्यात आले .त्याच बरोबर एच. पी .गॅस सुविधा केंद्राचे उद्घाटन सौ. संगीता हळदणकर( चंद्रभागा गॅस एजन्सी )यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संदीप गोरीवले (सामाजिक कार्यकर्ते) जनार्धन बारगोडे, महादेव बारगोडे इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. कॉमन सर्विस सेंटरचे संचालक प्रवीण बारगोडे  यांनी आपल्या वक्तव्यातून पुढील मत व्यक्त केले. सरकारी सेवांचा लोकांना लाभ घेता यावा त्याचप्रमाणे डिजिटल सेवेपासून वंचित राहिलेल्या लोकांना ही सेवा प्राप्त व्हावी म्हणूनच सेवा केंद्र सुरू करत आहोत .विद्यार्थ्यांना देखील या सेवेमुळे स्पर्धा परीक्षामध्ये भाग घेण्याची संधी मिळेल कोणताही विद्यार्थी या सेवांपासून वंचित राहणार नाही.

ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८