जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी केली स्वतःच्या विद्यार्थिनीला मारहाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल

ऐवडी वादग्रस्त कारकीर्द असतानी कविता नांवदे जिल्हा क्रीडा अधिकारी यांना विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर पाठीशी घालीत आहेत ?

जिल्हा क्रीडा अधिकारी हे पद 'अ' श्रेणी असून सुद्धा आंब्याचे पैसे नांवदे यांनी हाडपले आहेत.

औरंगाबाद प्रतिनिधी : रत्नागिरी आंबा खरेदीच्या व्यवहारातून विक्रेत्या महिलेने पैसे मागितल्याने वर्ग एकच्या महिला जिल्हा क्रीडा अधिकारी (औरंगाबाद) यांनी संबंधित विक्रेत्या महिलेस मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. हा प्रकार बुधवारी (ता.२२) सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान घडला. याप्रकरणी आंबा विक्रेत्या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन जवाहरनगर पोलिस ठाण्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्याविरोधात एनसी दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात रत्नागिरी जिल्ह्यातील ३९ वर्षीय फिर्यादी महिलेने जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार क्रीडा अधिकारी कविता नावंदे (रा. योगायोग विश्वकर्मानगर, पाषाण सुस रस्ता, पुणे, सध्या. रा. औरंगाबाद) या २७ वर्षीय फिर्यादी महिलेच्या ओळखीच्या आहेत. नावंदे आणि फिर्यादी महिला यांच्यात मार्च २०२० मध्ये आंबा खरेदीविक्रीचा व्यवहार झाला होता. व्यवहाराचे पैसे नावंदे यांच्याकडून आंबा विक्रेत्या महिलेस देणे बाकी होते, त्यामुळे सदर महिला नावंदे यांना वारंवार फोन करत होती. मात्र संपर्क होत नसल्याने फिर्यादी महिलेने औरंगाबादेतील विभागीय क्रीडा संकूलाचे कार्यालय गाठत नावंदे यांना व्यवहारातील पैशांची मागणी केली. दरम्यान नावंदे यांनी ‘माझा तुझा काही संबंध नाही, मी तुला ओळखत नाही’ असे म्हणून सदर महिलेस मारहाण करुन शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीवरुन जवाहनरनगर पोलिस ठाण्यात नावंदे यांच्याविरोधात कलम ३२३, ५०४, ५०६ नुसार एनसी दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल जाधव करत आहेत.

  स्पोर्ट्स  पॅनोरमा सोबत बोलताना २७ वर्षीय फिर्यादी महिलेने सांगितले की  मी त्यांची विद्यार्थिनी असून त्यांनी मला रत्नागिरी येथे स्वसंरक्षणचे धडे दिले आहे.2 लाख 58 हजारचे आंबे विक्री करण्याकरता मागच्या मार्च २०२० मध्ये आणले होते फक्त मी त्याला विचारणा करता गेले की तुम्ही माझा फोन उचलत नाही ब्लॉक केला व्हाट्सअप वर काही रिप्लाय देत नाही.याविषयी विचारणा करण्यास गेले असता मला मोबाईल फोन हिसकावून घेउन मारहाण केली. एक अधिकारी असुन या मॅडम असे वागतात.

कारकीर्दही वादग्रस्तच

  विविध कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या नावंदे यांची ऑगष्ट २०२० मध्ये नगरहून बदली हिंगोलीला झाली होती. त्यांच्या बदलीसाठी नगरमधील बहुतांशी क्रीडा संघटनांनी देव पाण्यात ठेवले होते. त्यांच्या बदलीसाठी संघटनांनी असहकार आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले होते. नावंदे यांची राज्य पातळीवरून तीन वेळा समिती मार्फत चौकशीही करण्यात आली होती. पून्हा आपला रंग दाखवून दिल्याने क्रीडा विश्वात अनेक चर्चाना ऊत आला आहेत. 


ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८