मचछीमार व्यावसायीकांचे कन्नड तहसिल समोर उपोषण

संभाजीनगर जिल्ह्यात मच्छीमारांचा शासनाला कसा ? पडला विसर.मचछीमार व्यावसायीकांचे कन्नड तहसिल समोर उपोषण.

औरंगाबाद प्रतिनिधी : औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तालुक्यात धरणातील मागील लाॅकडाऊन मुळे बाजारपेठ बंद असल्याने धरणात साठवलेली लहान मोठे मासे व हया पावसाळ्या आगोदर सोडलेले मच्छी बिजं  वाहून गेल्या  मुळे सर्व मचछीमार संकटात सापडले आहे  झालेल्या नुकसानीची  भरपाई साठी तहसिल कार्यालय येथे भारतीय मच्छुवारा समाज संघटना  चे मराठवाडा अध्यक्ष यांच्या  नेतृत्वाखाली संस्थे चे चेअरमन सचिव प्रतिनिधीसह तहसिल कार्यालयासमोर उपोषण केले.

मात्र नुकसानीचे पंचनामे करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने सायंकाळी उपोषण मागे घेण्यात आले. भारतीय मच्छुवारा समाज संघटना व महाराष्ट्र राज्यकृती समिती च्या वतीने व्यावसाईकांच्या विविध मागण्यां सोडविण्यात याव्या यासाठी कन्नड तहसिल कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.शासनाने नुकसानीचे पंचनामे शेतकरयाचया प्रमाणे भरपाई दयावी,पीक विमा प्रमाणे मासे विमा योजना  लागू करावी,सन 2015च्या शासन आदेशानुसार मच्छी बिजं शेती विशिष्टा हे. 8200 प्रती हेक्टरी प्रमाणे सहकारी संस्था ना मदत म्हणुन दयावी आदी मागण्या करण्यात आल्या .

दरम्यान तहसीलदार संजय वारकर यांनी आंदोलकांशी चर्चा करून ग्रामसेवक तलाठी यांच्या मार्फत मच्छ व्यावसाईकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. नायब तहसीलदार हारून शेख राजे शाहू महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅ सितारामजी जाधव शिवसेना उप तालुका प्रमुख शिवाजी थेटे  शहर प्रमुख सुनिल पवार  मा.उप सभापती काकासाहेब तायडे  भारतीय मचछीमार संघटनचे अध्यक्ष तुकाराम वानखेडे किरण राठोड यांनी आदोलकांशी चर्चा केली. त्या नतंर उपोषण मागे घेण्यात आले. या प्रसंगी भारतीय मच्छुवारा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष चंद्रकांत लाडे यांच्या सह भावलाल बिरोटे किशोर पवार वजीर शेख दीपक बिरोटे नंदू बिरोटे किशोर बिरोटे युवराज कुंदळे विलास पिंपळे प्रभाकर मोरे नामदेव सुखदेव अंकुश वानखेडे कैलास लाडे  रशीद अब्दुल खान पठाण  बाळासाहेब  सुरासे महादु चव्हाण  भिकन परदेशी यांची उपस्थिती होती.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८