महापालिका परिसरात आज साकारले कायापालट अभियान !

ल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी कल्याण-डोंबिवली महापालिकेत रुजू झाल्यानंतर, त्यांच्या संकल्पनेतून महापालिका परिसर नागरिकांसाठी स्वच्छ आणि सुंदर व्हावा यासाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात कायापालट अभियान राबविण्यास सुरुवात झाली होती. परंतु नंतर कोविड महामारीमुळे सदर अभियानाला काही प्रमाणात खिळ बसली  परंतु आता कोविड  रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार महापालिका परिसरात पुनश्च सर्वत्र कायापालट अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे ,त्याचाच एक भाग म्हणून आज फ प्रभागातील 90 फुटी रोडवर मसोबा चौक, येथून कायापालट अभियानास प्रारंभ झाला.  यामध्ये रोडच्या बाजूचे गवत काढून टाकण्यात आले आणि रस्त्यामधील डिव्हायडर पाण्याने स्वच्छ करण्यात आले. महानगरपालिकेच्या आय प्रभागातही  कायापालट अभियान आज सकाळपासून राबविण्यात आले.  यामध्ये श्री मलंग रोडवरील संपूर्ण रस्त्यावरील गवत, माती, कचरा साफ करण्यात आला तसेच फॉगिंग मशीन द्वारे धूर फवारणी आणि ट्रॅक्टर द्वारे कीटकनाशक आणि जंतूनाशक फवारणी करण्यात आली. महानगरपालिकेच्या इ प्रभागात नेकडी पाडा बस स्टॉप ते मानपाडा सर्कल पर्यंत कायापालट अभियान आज राबविण्यात आले,तर ग प्रभागात चार रस्ता (सिग्नल) ते टीप टॉप स्वीट मार्ट पर्यंत कायापालट अभियान राबविण्यात आले.  

    महापालिकेच्या इतर प्रभागातही आयुक्तांचे निर्देशानुसार आज कायापालट अभियान राबविण्यात येत असून हे अभियान यापुढेही सुरू राहणार आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८