डोंबिवलीतील रस्त्यांवर सापडणा-या कच-याबाबत कारणे शोधू

डोंबिवलीतील रस्त्यांवर सापडणा-या कच-याबाबत कारणे शोधून त्यावर उपाय योजना करणेबाबत -उप आयुक्त रामदास कोकरे यांनी केले मार्गदर्शन ! 

ल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार, घनकचरा विभागाचे उप आयुक्त रामदास कोकरे यांचे मार्गदर्शनाखाली दि. 25 मे 2020 पासून महानगरपालिकेने " शुन्य कचरा मोहिम" राबविण्यास सुरुवात केली आहे तसेच संपूर्ण परिसर  सातत्याने स्वच्छ राहण्यासाठी सध्या कायापालट अभियान ही राबविण्यात येत आहे. सद्यस्थितीत निर्माण होणा-या कच-याचे 80-90 टक्के  वर्गीकरणही होत आहे , असे असतांनाही शहरात काही ठिकाणी कचरा पडत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त होत असल्यामुळे  रस्त्यावरील तसेच चौकातील वारंवार कचरा पडणाऱ्या ठिकाणांवर (Garbage Vernalable Points) नेहमी आढळणा-या कच-याबाबतची कारणे शोधून त्यावर कायम स्वरुपी उपाय योजना करणेबाबत आज घनकचरा विभागाचे उप आयुक्त रामदास कोकरे यांनी डोंबिवलीतील फ, ग आणि ह प्रभागातील मुख्य आरोग्य निरिक्षक, आरोग्य निरिक्षक यांची बैठक बोलावून स्पष्ट सूचना दिल्या आणि त्यांच्या कार्यपध्दतीच्या नियोजनाबाबत आढावा घेतला.या बैठकी मध्ये सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी ऑगस्टीन घुटे मुख्य आरोग्य निरीक्षक वसंत देगलूरकर व फ, ग आणि ह प्रभागातील सर्व आरोग्य निरीक्षक, शिक्षक उपस्थित होते.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८