अवयवदान बाबत काम करणाऱ्या विभागीय प्रतिरोपण समन्वय केंद्रांची संख्या वाढवावी. सध्या पुणे मुंबई नागपूर आणि औरंगाबाद येथे ही केंद्र आहेत. यापुढे कोल्हापूर नाशिक अमरावती लातूर येथे ही केंद्र सुरू करावी असे टोपे यांनी सांगितले.अवयवदान आणि अवयव प्रत्यार्पणाबाबत लोकांत जागृती करावी. अवयवदानाबाबत लोकांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे असेही त्यांनी सांगितले.बैठकीस राज्य सल्लागार समितीचे सदस्य डॉ.सुजाता पटवर्धन डॉ.जी. बी. डावर डॉ.सुरेंद्र कुमार माथूर डॉ.राहुल पंडित आरोग्य विभागाचे उपसचिव शि. मी. धुळे डॉ.अरुण यादव डॉ.कैलास जावंदे आदी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८