महापालिकेच्या ब प्रभागातील अनधिकृत बांधकाम निष्कासनाची धडक कारवाई !

ल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार विभागीय उपायुक्त अर्चना दिवे यांचे मार्गदर्शना खाली ब प्रभागातील सहा.आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी कल्याण (प),उंबर्डे गाव येथील शासकीय जागेवरील 3 अनधिकृत गाळयाचे बांधकाम निष्कासित करण्याची धडक कारवाई आज केली. सदर कारवाई महापालिकेचे अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी/कामगार, महापालिकेचे पोलिस कर्मचारी व1 जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आली.

महापालिकेच्या आय प्रभागातील अनधिकृत बांधकाम निष्कासनाची धडक कारवाई ! 

   आय प्रभागातील सहा.आयुक्त राजेश सावंत यांनी आडीवली ढोकळी येथील ओ.पी. सिंग यांचे G +1 इमारतीचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची धडक कारवाई आज केली. त्याचप्रमाणे द्वारली येथील मदन चिकनकर यांच्या 7 अनधिकृत चाळी निष्कासनाची कारवाई देखील आज करण्यात आली. ही कारवाई महापालिकेचे अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी/कामगार यांच्या सहाय्याने करण्यात आली.

ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८