खड्ड्यांची तक्रार नोंदविण्यासाठी महापालिकेने सुरू केली टोल फ्री

हानगरपालिका क्षेत्रातील खड्ड्यांची तक्रार नोंदविण्यासाठी महापालिकेने सुरू केली टोल फ्री क्रमांकाची सुविधा !

ल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : महानगरपालिका गेले तीन महिने कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबतच्या तक्रारी सोशल मीडियाच्या माध्यमातून, वृत्तपत्रातून मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. पावसाची उघडीप मिळाल्याबरोबर महानगरपालिकेने यापूर्वीच खड्डे भरण्याचे/ रस्ते दुरुस्तीचे कामास प्रारंभ केला आहे. आता महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सुविधेसाठी, महानगरपालिकेने रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांसाठी तक्रार नोंदविण्याकरिता 1800 233 0045 या टोल फ्री क्रमांक ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तरी नागरिकांनी रस्त्यांवरील खड्डयांबाबतच्या आपल्या तक्रारी कार्यालयीन दिवशी व कार्यालयीन वेळी वरील टोल फ्री क्रमांकावर नोंदवाव्यात  असे आवाहन महानगरपालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी- देवनपल्ली यांच्या मार्फत करण्यात येत आहे.
ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८