राज्यपालांच्या हस्ते बांगलादेश मुक्ती लढ्यातील वीरांचा सन्मान
कार्यक्रमाला बांगलादेशचे मुंबईतील उप उच्चायुक्त मोहम्मद लुत्फुर रहमान, बांगलादेशचे नवी दिल्लीतील उप उच्चायुक्त नुरुल इस्लाम, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे व ऑल इंडिया असोसिएशन फॉर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष विजय कलंत्री उपस्थित होते. यावेळी बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री डॉ ए के एम अब्दुल मोमीन यांचा व्हिडीओ संदेश दाखविण्यात आला. शेख मुजिबुर रहमान सच्चे धर्मनिरपेक्ष नेते होते. आपल्या पक्षाचे नाव त्यांनी 'मुस्लिम अवामी लीग' असे न ठेवता 'अवामी लीग' असे ठेवले असे राज्यपालांनी नमूद केले. अपर्णा वेलणकर यांनी शेख मुजीब यांच्या पुस्तकाचे मराठी भाषेत भाषांतर करून भारत व बांगलादेशातील मैत्रीसंबंध अधिक दृढ करण्यात मोठे योगदान दिले आहे असे राज्यपाल यावेळी म्हणाले. शेख मुजीब यांच्या 'प्रिझन डायरीज' या पुस्तकाचे देखील मराठीत भाषांतर व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज्यपालांच्या हस्ते अपर्णा वेलणकर तसेच इंडिया प्रिंटिंगचे आनंद लिमये यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात बांगलादेश व भारताच्या राष्ट्रगीताने झाली.