महानगरपालिका व बेस्ट कर्मचाऱ्यांना दीपावली २०२१ साठी सानुग्रह अनुदान जाहीर
सानुग्रह अनुदान रक्कम तपशिल
१ ) महानगरपालिका आणि बेस्ट अधिकारी / कर्मचारी, प्राथमिक शिक्षक -रु. २०,०००/-
२) माध्यमिक शाळा तसेच खासगी अनुदानित शाळा यातील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी, अध्यापक विद्यालयातील अधिव्याख्याते व शिक्षकेतर कर्मचारी रु. -१०,०००/-
३) प्राथमिक शिक्षण सेवक - रु. ५,६००/-
४) आरोग्य सेविका -रु. ५,३००/-
५) विनाअनुदानित माध्यमिक शाळा तसेच खासगी अनुदानित प्राथमिक शाळा शिक्षण सेवक -रु. २,८००/-
बैठकीला उप महापौर ऍड. सुहास वाडकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा, सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच बेस्ट उपक्रमाच्या अधिकारी / कर्मचारी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.