कोरोना नियंत्रणासाठी मनपा प्रशासकांनी घेतले महत्वपूर्ण निर्णय
औरंगाबाद प्रतिनिधी : औरंगाबाद शहरात मागील दोन वर्षात कोविड -19 या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने मा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी वेळोवेळी महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यात प्रामुख्याने सर्व प्रथम औरंगाबाद महानगरपालिका आस्थपना वरील सर्व अधिकारी /कर्मचारी यांच्या कोविड -19 प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झाल्याची खातरजमा संबंधित आस्था प्रमुख यांनी करावी .कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाल्याचे अंतिम प्रमाणपत्र सर्व संबधिताकडून प्राप्त करून घ्यावे .दि 30 नोव्हेंबर 2021 प्रयन्त दोन मात्रा पूर्ण झाल्याची खातरजमा करावी ज्यांनी पाहिली मात्रा घेतलेली आहे.तथापि ज्यांची दुसरी मात्रा 30 नोव्हेंबर 2021 नंतरची आहे केवळ त्यांनाच या नियमातून वगळण्यात येईल .हा आदेश महानगरपालिकेत कार्यालयीन किंवा इतर कामकाजा करिता ,तसेच विविध मागण्यांबाबत कार्यालयात येणाऱ्या सर्व अभ्यंगत यांचे साठी लागू राहील.लस नाही तर प्रवेश नाही ह्या नियमाची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.सदर नियम स्मार्ट सिटी कार्यालायाला सुद्धा लागू राहील.औरंगाबाद महानगरपालिका आस्थपणा शिवाय शहरातील शासकीय व खाजगी कार्यलाय ,जलतरण तलाव ,योगा संस्था ,इन डोअर स्पोर्टस,सिनेमा हॉल ,नाट्यगृह, मल्टिप्लेक्स ,कृषिउत्पन बाजार समिती,हॉटेल व्यवसायिक ,मंगल कार्यालय ,सर्व प्रकारचे दुकाने ,खाजगी रुग्णालये औद्योगिक आस्थपणा महाविद्यालय व सर्व माध्यमांच्या शाळा मधील शिक्षक महाविद्यालयातील विद्यार्थी व इतर कार्यरत आस्थापना वरील सर्व कार्यरत अधिकारी कर्मचारी कामगार
अभ्यंगत यांची कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण चे दोन्ही डोस पूर्ण झाल्याची खातरजमा करून प्रवेश द्यावा.
शहरातील पेट्रोल पपं चालकांनी स्वतः लसीकरण करून घ्यावे तसेच संबंधित कर्मचारी यांनी दोन्ही डोस पूर्ण केल्याची खातरजमा करावी तसेच पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या लसीकरण पूर्ण झाल्याची खातरजमा केल्यानंतरच इंधन देण्यात यावे असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
लस नाही तर प्रवास नाही
यानुसार आंतरजिल्हा व आंतरराज्य बसने /खाजगी वाहनाने प्रवास करण्यासाठी कोविड -19 प्रतिबंधात्मक लसीकरनाचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याची खातरजमा करावी व नंतरच प्रवेश देण्यात यावा.वर नमूद कोविड लसीकरण बाबत दिनांक 30 नोव्हेंबर 2021 प्रयन्त दोन डोस झाल्याची खातरजमा करावी .पहिला डोस घेतलेला आहे तथापि दुसऱ्या डोस चा दिनांक 30 नोव्हेंबर 2021 नंतरचा आहे फक्त त्यांनाच या नियमातून वगळण्यात येईल .हा नियम सर्वांसाठी लागू राहील.सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती,संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास किंवा विरोध दर्शविल्यास संबंधित आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय/कायदेशीर कार्यवाहिस पात्र राहील असे वर नमूद आदेशात म्हटले आहे.करिता सर्व नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे व प्रशासनास सहकार्य करावे व आपली गैरसोय टाळावी असे आवाहन मा.प्रशासक औरंगाबाद महानगरपालिका यांच्या वतीने करण्यात येत आहे.
उद्योगिक आस्थापना आणि हॉटेल्स
याच बरोबर औरंगाबाद महानगरपालिका तर्फे सीआयाय, सिएमएआय आणि मासिया या उद्योगिक संस्थांना पत्र देऊन कळविलण्यात आले आहे की त्यांनी प्रत्येक कंपनीच्याआस्थापनेवरील सर्व अधिकारी व कर्मचारी त्याच बरोबर कंपनीला भेट देणारे अभ्यागतानी कोरोनाची लस घेतलेली आहे याची खातरजमा करावी. याशिवाय सर्व हॉटेल्स चालकांना निर्देश देण्यात आले आहे की 30 नोव्हेंम्बर 2021 पर्यंत त्यांनी त्यांच्या आस्थापनेवर सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे. हॉटेल्सचे ग्राहक आणि भेट देणारे अभ्यागत यांनी कोरोना लस घेतली आहे याची खातरजमा करूनच त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश द्यावे.