जे वाटूमल साधुबेला महिला महाविद्यालयाला नॅक मध्ये B+ ग्रेड

उल्हासनगर प्रतिनिधी : साधुबेला शैक्षणिक संस्थेचे जे वाटूमल साधुबेला महिला महाविद्यालय उल्हासनगर ला राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद(नॅक)ने 29 आणि 30 नोव्हेंबर ला भेट देऊन  B+ ग्रेड आणि 6.67 CGPA दिला असून ही महाविद्यालयाची सेकंड सायकल होती. या सर्व प्रोसेसमध्ये  सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अतिशय कठीण परिश्रम घेतले असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत माळी आणि IQAC समन्वयक डॉ. दत्तात्रय काळबांडे यांनी सांगितले. महाविद्यालयाची पहिले नॅक मूल्यांकन 2003 साली झाले होते आणि ग्रेड C++ मिळाला होता. त्यानंतर हा मिळालेला ग्रेड हा संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय महत्वपूर्ण असून यापुढे दर्जेदार शिक्षण देऊन पुढील मूल्यांकन प्रक्रियेत A श्रेणी मिळवण्याचा प्लॅन तयार असल्याचे सांगितले.

    या यशाबद्दल संस्थेचे चेरमन उत्तमसिंग पवार सचिव मा. नितीन बागवे आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८