अनाधिकृत जाहिरात पोस्टर्सवर विद्रुपीकरण केल्याबद्दल आता गुन्हे दाखल करणार !

महापालिका परिसरात रस्त्यांवर अनधिकृतपणे लावलेल्या बॅनर्स पोस्टर्स वर निष्कासनाची धडक कारवाई !

ल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : महापालिका परिसर अधिकाधिक स्वच्छ सुंदर व्हावा शहरातील  पदपथांवरून नागरिकांना चालणे सोयीचे व्हावे यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून सर्व प्रभागांत सातत्याने कायापालट  अभियान राबविण्यात येत आहे. याच अभियानांतर्गत आज५/ड प्रभागात सहा. आयुक्त सविता हिले यांनी  कर्मचारी वर्गासह पूना लिंक रोड वर अनाधिकृतपणे लावलेले बॅनर्स पोस्टर्स झेंडे निष्कासित करण्याची धडक कारवाई केली आणि संबंधितांना मालमत्ता विद्रुपीकरण अधिनियमाअन्वये गुन्हा का दाखल करू नये याबाबत नोटिसा बजावल्या. महापालिकेच्या 9/ आय प्रभागातही सहा.आयुक्त संजय साबळे यांनी आज बिकानेर मिठाईवाला ते नेवाळी नाका पर्यंत शंभर फुटी रस्त्यावर लावण्यात आलेले बॅनर्स निष्कासित करण्याची कारवाई केली. आय प्रभागाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या कर्मचारी वर्गाकडून रस्त्यावर असलेले अनधिकृत फेरीवाले यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आणि रस्त्याच्या पदपथावर असलेल्या टपऱ्या निष्कासित करण्यात आल्या तसेच ताडपत्री शेड टाकून सुरू असलेल्या अनधिकृत व्यवसायांवर देखील कारवाई करण्यात आली  3/क भागातही सहा. आयुक्त सुधीर मोकल यांनी पोलीस उपनिरीक्षक नागरे व अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी यांच्यासह कल्याण स्थानक परिसरातील दिपक हॉटेल पुष्कराज हॉटेल महालक्ष्मी रोड या ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाई केली.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८